संचमान्यतेच्या सुधारित निकषास विरोध दर्शवित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे निवेदन
पत्रकार - गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
शासनाने निर्गमित केलेल्या संचमान्यतेच्या १५ मार्च २०२४ च्या सुधारित निकषास विरोध दर्शवित शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांना लोहारा तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.
शासन निर्णयानुसार राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी प्रमाणात शिक्षक संख्या ठरविण्यासाठी संचमान्यतेचे सुधारित निकष निर्धारित केलेले आहेत.निकष लागू झाल्यास शेतकरी-शेतमजूर, कष्टकरी-कामकरी, शोषित-वंचित गरीब कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण लयाला जाण्याची व शिक्षण मिळण्याची सुविधा नष्ट होईल आणि शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरतील.
२० पटापर्यत एकच नियमित शिक्षक,प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम वेगवेगळा,पाठ वेगवेगवळे,अध्ययन निष्पत्तीही वेगवेगळ्या आहेत.एकाच वेळी इतके वर्ग सांभाळणे कठीण आहे.अनेक प्रकारची ऑनलाईन कामे शिक्षकांना करावी लागतात. मुख्याध्यापक म्हणून असणारी कामे करण्यासाठी शाळेबाहेर जावे लागते.काही शाळांमध्ये ऑनलाईन सुविधा,नेटवर्क, इंटरनेट सुविधेचा अभाव आहे.तसेच शाळेत विविध उपक्रम,जि.प.प्रशासनाने, राज्य शासनाचे उपक्रम,स्पर्धा यात सक्तीने सहभाग घ्यावा लागतो.वाढता कामाचा ताण, स्वास्थ्य विषयक अडचणी अशा अनेक कारणांमुळे कंत्राटी नेमणूक करण्यास निवृत्त शिक्षक संघटनांचा विरोध आहे.अनाकलनीय असे धोरणच मान्य नाही.शैक्षणिक अर्हताधारक नवीन शिक्षकांना नेमावे ही मागणी केली आहे.प्रत्येक वर्गाला पुरेसे नियमित शिक्षक उपलब्ध करून दयावे.त्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती लोहारा च्या वतीनेबतहसिलदार लोहारा यांना निवेदन देण्यात आले
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा प्रवक्ते कमलाकर येणेगुरे,जिल्हा उपाध्यक्ष बळी आलमले,तालुकाध्यक्ष भिमाशंकर डोकडे,तालुका नेते बालाजी साठे,कैलास माणिकशेट्टी,नागेश बंगले,मल्लिकार्जुन कलशेट्टी,आदि उपस्थित होते