न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

विद्युत पंप व स्पिंक्लरच्या चिमण्यासह रेणगन चोरणारे 2 आरोपी अटक  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

विद्युत पंप व स्पिंक्लरच्या चिमण्यासह रेणगन चोरणारे 2 आरोपी अटक

 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

धाराशिव /न्यूज सिक्सर
शेरकरवाडगा, ता.धाराशिव  येथील- भाऊसाहेब जालींदर शेरकर व सतिश शेरकर यांच्या उस्मानाबाद शिवारातील शेरकर वाडगा शेत गट नं 289 व 286 मधुन रेणगन व 500 फुट केबल अंदाजे 14,000 ₹ किंमतीचे, तसेच सांजा, ता. धाराशिव येथील- अमोल सुरेश सुर्यवंशी यांचे धाराशिव शिवारातील शेरकर वाडगा येथील तळ्यामधील विद्युत पंप अंदाजे 10,000 ₹ किंमतीचा असा माल दि.13.02.2023 रोजी 19.00ते 25.02.2023 रोजी 18.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला होता.अशा मजकुराच्या भाऊसाहेब शेरकर, अमोल सुर्यवंशी  यांनी दि.27.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत पोलीस ठाणे धाराशिव
शहर येथे  गुरनं.-102/2023, 103/2023  असे 2 गुन्हे नोंदवले आहेत.तसेच देवळाली, ता.धाराशिव
येथील- नारायण नामदेव सुर्यवंशी यांचे देवळाली व शेकापूर शिवारातील 34 स्पिंक्लर चिमण्या अंदाजे 22,000 ₹ किंमतीच्या दि.20.02.2023 रोजी ते  दि.17.02.2023 रेाजी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या.अशा मजकुराच्या नारायण सुर्यवंशी यांनी दि.27.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे 58/2023 गुन्हा नोंदवला आहे

सदर गुन्हे तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन इसम नामे सचिन भैरु ईटकर व किरण विनायक जाधव वय 25 वर्षे हे शेकापूर शिवारातील एका शेतात राहत असुन त्यांनी मागील काही दिवसापुर्वी शेतकी साहित्य चोरी केलेले असुन ते सध्या शेतामध्ये काम करत आहेत. अशी खात्रीलायक बातमी मिळालेवरुन स्था.गु.शा पथक  बातमीच्या  ठिकाणी  जावून दोन इसम यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव- सचिन भैरु ईटकर, वय 23 वर्षे, रा. सोनारी, ता. परंडा, किरण विनायक जाधव, वय 25 वर्षे, रा. आगळगाव, ता. बार्शी ह.मु  शेकापूर असे सागिंतले. त्याच्या कडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सागिंतले की, मागील काही दिवसा पुर्वी त्यांनी शेरकर वाडगा व शेकापुर परिसरातील शेतामधून एक विद्युत पंप, स्पिंक्लर व रेणगन चोरलेले आहे. त्यानंतर पोलीसांनी त्यांचे ताब्यातुन एक विद्युत पंप, स्पिंक्लर 5 चिमण्या, रेणगन असा एकुण 25,620 ₹ किंमतीच्या मुद्देमाल ताब्यात घेतला असुन सदर मुद्देमाल बाबत खात्री केली असता तो पोलीस ठाणे धाराशिव शहर  गुरनं 102/2023, 103/2023 भा.द.सं. 379 व धाराशिव ग्रामीण गुरनं 58/2023 भा.द.सं. 379 मधील चोरीस गेलेला मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाल्याने  मुद्देमालासह दोन आरेपीतांना  पुढील कारवाईस्तव पोलीस ठाणे धाराशिव
शहर, यांचे ताब्यात दिले.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्थागुशा च्या पोनि- श्री. यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- श्री. ओहाळ, पोलीस हावलदार- सय्यद, पठाण, सावंत, जाधवर, पोलीस अंमलदार- आशमोड, यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे