
मुरूम ( डॉ. रामलिंग पुराणे)
मुरूम येथील किसान चौकातील शिवजन्मोत्सव समितीचे वतीने दि.१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे स्थापना केली. प्रारंभी किसान चौकातून संपूर्ण मुरूम शहरात सायकल व बाईक रॅलीची आयोजन करण्यात आले होते, या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन करून, शिवरायांचे पाळणा घालण्यात आले. रॅलीच्या समोरोप नंतर किसान चौकात जयंतीनिमित्त स्थापना केलेल्या महाराजांचे मुरूम पोलीस प्रशासनाच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आरतीने पूजन संपन्न झाले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक डॉ.रंगनाथ जगताप, पोलीस कर्मचारी,राहुल वाघ, रामहरी अंबर,ओमकार फुगटे, शरणप्पा धुम्मा अक्षय जगदाळे सह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. यावेळी कु. शिवकन्या बाळासाहेब भालकाटे या मुलीने भाषण केले. जन्मोत्सव समितीच्या वतीने शिव जयंतीनिमित्त पाच दिवस विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दि.१९ रोजी रक्तदान शिबीर संपन्न झाले. ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.