सुट्टी संपुन देशसेवेसाठी जाणाऱ्या तुळजापूर येथील जवान विजय दरेकर शहीद

सुट्टी संपुन देशसेवेसाठी जाणाऱ्या तुळजापूर येथील जवान विजय दरेकर शहीद
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
सुट्टी संपुन देशसेवेसाठी पोस्ट वर जात असलेल्या सैन्य दलातील नाईक पदावर कार्यरत असलेल्या जवान विजय मोहन दरेकर याचे सोमवारी दि ३१रोजी सैन्य दलाचा गाडीतुन पठाणकोट हुन पालमपूर कडे पोस्टवर जात असताना अपघात होवुन शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडली,नाईक विजय दरेकर शहीद झाल्याचे समजताच शहरावर शोककळा पसरली .शहीद जवान विजय मोहन दरेकर हा २००२मध्ये सैन्यदलात भरती झाला होता तो पोस्ट पालमपूर येथे ईएमई बटालियन मध्ये कार्यरत होता शहीद जवान याचा पश्चात पत्नी ऐक मुलगा ऐक मुलगी आई वडील भाऊ बहीणी असा परिवार आहे.शहीद जवान विजय मोहन दरेकर हा २८जुलै२०२३रोजी सुट्टी संपुन देशसेवेत पठाणकोट येथे दाखल झाला होता तेथुन आर्मी गाडीतुन पठाणकोट हुन पोस्ट पालमपूर कडे जाताना अपघात होवुन त्यात तो शहीद झाला .मंगळवार सकाळी ते शहीद झाल्याची माहीती मिळाली पठाणकोट हुन सैन्यदलाचा विमानाने त्याचा पार्थिवदेह पुण्यात आणला जाणार असुन तेथुन तो तुळजापूर ला आणुन येथे शहीद जवानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहीती माजीसैनिक दत्ता नवगिरे यांनी दिली
पठाण कोट हुन सकाळी शहीद जवानाचा पार्थिवदेह बुधवार दि रोजी सैन्य दलाचा विमानाने पुण्यात आणला जाणार आहे.व गुरुवार दि ३रोजी
फौजी विजय दरेकर सकाळी ११वा त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शहीद झाल्याचे समजताच शहरावर शोककळा पसरली असुन विविध संघटना नी फलक लावुन त्यांना भावपुर्णश्रध्दांजली अर्पण केली आहे.