तुळजापूरात महायुतीकडून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मोठ्या उत्साहात साजरी…..
Post-गणेश खबोले

तुळजापूर-प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित आज दि.१४ एप्रील २०२४ रोजी दुपारी १२ वाजता तुळजापूर शहरातील आर्य चौकातून मोठ्या ढोलताशाच्या गजरात भवानी रोडमार्गे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यास राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिनी सदस्य गोकुळ तात्या शिंदे,शिवसेनेचे धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम,भाजपाचे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी,व युवानेते विनोद पिटूभैय्या गंगणे यांच्यासमवेत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
बाबासाहेबांनी कशाप्रकारे संघर्ष करून दलितांना त्यांच्या न्याय हक्काप्रती जागरूक केले आणि त्यांचे अधिकार त्यांना मिळवून दिले, याबद्दल चर्चा करून प्रेरणास्वरुप बाबासाहेबांच्या विचारांचा सर्वांनी अवलंब करावा असे आवाहन यावेळी उपस्थितांना करण्यात आले आणि जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पंडीत जगदाळे,विजय आबा कंदले,बापूसाहेब कणे,अविनाश गंगणे,बबन गावडे,महेश चोपदार,सुरज कोठावळे,दत्तात्रय हुंडेकरी,शाताराम पेंदे,औदुंबर कदम,राजाभाऊ मलबा,गुलचंद व्यवहारे,प्रताप कदम,बाळासाहेब शिंदे,प्रसाद पानपुडे,उमेश गवते,बाळासाहेब शामराज,सागर कदम,ज्ञानेश्वर घोडके,खंडू कुंभार,विशाल छत्रे,निलेश रोचकरी,निरंजन कारंडे,दिपक कदम,
तानाजी कदम,संजय शितोळे,अरविंद कदम,शहाजी जाधव,समर्थ पैलवान,यांच्यासह असंख्य महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होती.