सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये हमीभाव द्यावा ! सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीचे मंत्रालयासमोर आंदोलन !
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये हमीभाव द्यावा !
सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीचे मंत्रालयासमोर आंदोलन !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील मसला येथील ज्ञानेश्वर साळवे
महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रवादी किसान आघाडी यांच्या वतीने सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये हमीभाव द्यावा ,
सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीचे मंत्रालयासमोर आंदोलन सोयाबीनला प्रति क्विंटल किमान सहा हजार रुपये हमीभाव व कापसाला प्रतिक्विंटल दहा हजार रुपये हमीभाव व सरसकट कर्जमाफी करण्याबाबत दि २९ सप्टेंबर रोजी मा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मा धनंजय मुंडे कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना ज्ञानेश्वर साळवे
महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रवादी किसान आघाडी यांच्या वतीने
निवेदन देण्यात आले
निवेदनात असे नमूद केले आहे की शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत वारंवार आपणास व केंद्र सरकारकडे निवेदने दिली आहेत तरीदेखील आपले व केंद्र सरकार शेतकऱ्यांचे हाल करत आहे. सध्या सोयाबीनचा एकरी खर्च 20 ते 25 हजार होत आहे व एकरामध्ये पाच क्विंटल सरासरी सोयाबीन निघते हमीभाव 4892 या प्रमाणे पाच क्विंटल चे 24460 रुपये होतात म्हणजे फक्त सोयाबीनचा हमीभावाप्रमाणे विकल्यास फक्त खर्च निघतो त्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपये किमान हमीभाव देण्यात यावा तसेच त्याचप्रमाणे कापसाला देखील 10 हजार रुपये प्रतिक्विंटल हमी भाव देण्यात यावा. सध्या बाजारात हमीभावापेक्षाही कमी भावात विकली जात आहे आहे. जर केंद्र सरकार हमीभाव सहा हजार रुपये प्रतिक्विंटल करत नसेल तर आपण वरील 1108 प्रतिक्विंटल बोनस देऊन ₹6,000 प्रतिक्विंटल याप्रमाणे शेतकऱ्यांचा सोयाबीन सरसकट खरेदी करावा व त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील 48 तासाच्या आत देण्यात यावे. तसेच मराठवाडा व विदर्भामध्ये कर्जबाजारीपणामुळे व नापिकीमुळे कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले आहे व कर्जमाफी न दिल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढू शकतात त्यामुळे तात्काळ सरसकट कर्जमाफी देण्यात यावी याबाबत दि 30 सप्टेंबर रोजी मंत्रालयासमोर सरकारच्या विरोधात मंत्रालया समोर सोयाबीन फेकून आंदोल करण्यात आले ओषण कर्ते ज्ञानेश्वर साळवे
महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रवादी किसान आघाडी