ब्रेकिंगमहाराष्ट्र
तहसिल कार्यालय तुळजापूर येथे कॅम्प आयोजित केला आहे. कॅम्प मध्ये नागरीकांनी आधार कार्ड अपडेट करुन घ्यावे – तलाठी अशोक भातभागे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तहसिल कार्यालय तुळजापूर येथे कॅम्प आयोजित केला आहे.
कॅम्प मध्ये नागरीकांनी आधार कार्ड अपडेट करुन घ्यावे – तलाठी अशोक भातभागे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरामधील विशेष सहाय्य योजनेच्या (संजय गांधी/इंदिरा गांधी/ श्रावणबाळ योजना) लाभार्थी यांना कळविण्यात येते की ,दिनांक १६/०७/२०२४ दि.१९/०७/२०२४ रोजी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तहसिल कार्यालय तुळजापूर येथे कॅम्प आयोजित केला असून त्यामध्ये लाभार्थी यांनी आपले आधार कार्ड अपडेट करुन घ्यावे .अन्यथा अनुदानाची रक्कम पुढील महिन्यापासून दिली जाणार नाही.याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन तहसिलदार अरविंद बोळंगे व
तलाठी सज्जा-तुळजापूर अशोक भातभागे यांनी केल आहे.