श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान चे १०८ भक्त निवासचे ईमारतीच्या छत गळती !
दि.४ सप्टेंबर रोजी एकदिवशीय लाक्षणिक उपोषण !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान चे १०८ भक्त निवासचे ईमारतीच्या छत गळती !
दि.४ सप्टेंबर रोजी एकदिवशीय लाक्षणिक उपोषण !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापुर यांनी (महाराष्ट्र शासनाने तुळजापुर विकास प्राधिकारण स्थापन करुन दिलेल्या निधितुन) बांधलेल्या १०८ भक्त निवासचे ईमारतीच्या छत गळती थांबविण्यासाठी तात्काळ निविदा काढणे बाबत दि. ०४/०९/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार या मागणी दि.२१ आँगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र साळुंके यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात असे नमूद केले आहे की,श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापुर यांनी (महाराष्ट्र शासनाने प्राधिकरण स्थापन करुन दिलेला निधीमधून ) बांधलेल्या १०८ भक्त निवासचे ईमारतीचे संपूर्ण बांधकाम हे अति निकृष्ठ दर्जाचे झालेले असुन ईमारतीच्या संपुर्ण भिंती मध्ये (सर्व मजले) पावसाच्या पाण्याने मुरत असुन, ईमारतीच्या भिंती या पुर्णपणे ओल्या झाल्याचे निदर्शनास येत आहे.ईमारत हि राहण्यासाठी धोकादायक आहे. तसेच कोणत्याही क्षणी भाविकांच्या जीवीतास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिनांक १९/०८/२०२३ रोजी जिल्हाधिकारी ओम्बासे यांनी तुळजापुर शहरातील विविध विषयासाठी पायी फिरुन पाहणी केली त्यावेळी १०८ भक्त निवासाची पाहणी करणे अपेक्षित होते. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते रविंद्र साळुंके यांची स्वाक्षरी आहे.