अणदूर सोसायटी निवडणूकीत पत्रकार शिवाजी कांबळे यांचा विजय,पत्रकार संघाच्या वतीने सत्कार

अणदूर सोसायटी निवडणूकीत पत्रकार शिवाजी कांबळे यांचा विजय,पत्रकार संघाच्या वतीने सत्कार
वागदरी /न्यूज सिक्सर
आयडीयल पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष तथा देवराज मित्रमंडळाचे धाराशिव (उस्मानाबाद)जिल्हा अध्यक्ष शिवाजी रतन कांबळे यांचा अणदूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणूकीत दणदणीत विजय झाला असून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालूका शाखा तुळजापूर सह मित्रपरिवारानी त्यांचा सत्कार केला आहे.
नुकतच विविध कार्यकारी सेवा सोसायटी अणदूर ता.तुळजापूर ची एकूण १३ जागेसाठी संचालक पदाची सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत १३ जागे पैकी १२ जागा बिनविरोध झाल्या असून अनुसूचित जाती गटातून फक्त एका जागे करिता देवराज मित्रमंडळाचे जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार शिवाजी रतन कांबळे व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव आर.एस.गायकवाड यांच्यात एकास एक लढत झाली. या लढतीत शिवाजी कांबळे यांच दणदणीत विजय झाला. त्यांच्या या विजया बद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका शाखा तुळजापूर सह मित्रपरिवारांच्या वतीने शिवाजी कांबळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका सल्लागार एस.के.गायकवाड, पत्रकार भैरवनाथ कानडे, सतिश राठोड, खुदावाडीचे माजी उपसरपंच बापू बोंगरगे,सिकंदर अंगुले सह कार्यकर्ते उपस्थित होते.