अणदूरच्या ‘श्री श्री गुरुकुल’ चा निकाल १०० टक्के

अणदूरच्या ‘श्री श्री गुरुकुल’ चा निकाल १०० टक्के
अणदूर/न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल या शाळेचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.एकूण ३२ विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थी ९० टक्के पेक्षा अधिक गुण तर १३ विद्यार्थी ८० टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.या शाळेनी सलग चौथ्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
श्रावणी प्रभाकर सावंत (९८.२०) गुण घेऊन शाळेत प्रथम,सृष्टी जयवंत मुळे (९५.६०) द्वितीय,भीमाशंकर राजेंद्र पाटील (९५) तृतीय क्रमांक मिळविला आहे.तर श्रेया विद्यानंद सुत्रावे (९४),पवन धोंडीबा चव्हाण ( ९३.२०), विशाखा रमेश काळे (९३),प्रगती बाबासाहेब पाटील (९३), नम्रता अनिल कुलकर्णी (९२.६०),संचिता दशरथ शिंदे (९१), श्रेयश शिवानंद करंडे (९०.८०) या विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांना शिवराज भुजबळ,वर्गशिक्षक ज्ञानेश्वर बंडगर,डॉ रूपाली कानडे,,भाग्यश्री गोरे,संतोष मोकाशे,पुष्पा लामतुरे,मोहिनी बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे,डॉ रुपाली कानडे,डॉ नागनाथ कुंभार,लक्ष्मण नरे,शिवराज भुजबळ यांनी अभिनंदन केले आहे.