ब्रेकिंग
शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय येथे लोहारा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय येथे लोहारा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली प्रा. मनोज सोमवंशी यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित विविध उपक्रम राबविण्यात आले. जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. प्रतिमापूजन प्रसंगी प्रा. डॉ.प्रभाकर गायकवाड डॉ. विनोद आचार्य, प्रा. दत्ता कोटरंगे, डॉ.पार्वती माने, डॉ. शिरीष देशमुख, संजय फुगटे, प्रकाश राठोड, दत्ता पांचाळ आदी कर्मचारी व प्राध्यापक उपस्थित होते.