नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात शिवजन्मोत्सव निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे वाटप युनिटी मल्टीकाँन कंपनीने राबविलेल्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात शिवजन्मोत्सव निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे वाटप
युनिटी मल्टीकाँन कंपनीने राबविलेल्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
नळदुर्ग /न्यूज सिक्सर
नळदुर्ग ता.तुळजापूर येते युनिटी मल्टीकाँन प्रा.ली.कंपनी सोलापूरच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवजी महाराज यांच्या १०१ पुतळ्याचे मोफत वाटप नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात करण्यात आले.
नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला हा महाराष्ट्रातील पर्यटन स्थळा पैकी एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जात असून युनिट मल्टीकाँन प्रा.लि.कंपणीने हा किल्ला देखभाल दुरुस्ती वापर आणि हस्तांतरण (BOT) तत्वावर ताब्यात घेवून पर्यटकांच्या द्रष्टीणे अत्याधुनिक सोयी सुविधा केलेल्या आहेत. युनिटी मल्टीकाँन प्रा.लि.कंपणीचे मुख्यकार्यकारी संचालक कपील मौलवी व जयधवल करकंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने माजी कँबीनेट मंत्री मधुकरराव चव्हाण, तुळजापूर विधानसभेचे विद्यामान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते व नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१७ फेब्रुवारी २०२३ रोजी नळदुर्ग व परिसरातील १०१ शिवरायांच्या अनुयायांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे.यावेळी माजी नगराध्यक्ष नय्यर जहागीरदार, शहबाज काझी, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे,माजी नगरसेवक कमलाकर काका चव्हाण सह येथील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युनिटी मल्टीकाँन कंपनीने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.