
लोहारा / प्रतिनीधी
पुरोगामी महाराष्ट्रात राहून बहुजन महापुरुषांची सातत्याने बदनामी करणार्या, सांविधानिक पदावर राहून सांविधानिक मर्यादांची तमा न बाळगता, राजभवनाला राजकारणाचा अड्डा बनवणाऱ्या राज्यपाल कोशारीची हकालपट्टी झाली त्याबद्दल समस्त शिवप्रेमी तसेच समस्त महापुरुषांच्या अनुयायांनी फटाके फोडून,पेढे वाटून जल्लोष साजरा केला. तसेच कोषारीला भविष्यात असे कोणतेही पद मिळू नये, ज्याच्या माध्यमातून ते सांविधानिक मर्यादा आणि मुल्य पायदळी तुडवतील; एवढीच अपेक्षा सर्वांनी व्यक्त केल्या आहेत.
यावेळी उपनगराध्यक्ष आयुब शेख, नाना पाटील,आप्पा देवकर,प्रकाश भगत,श्याम नारायणकर, सुनील ठेले,महेश गोरे,बाळासाहेब पाटिल,गंगाराम भोंडवे,शैलेश कांबळे,रंजनाताई हासुरे,बाळासाहेब लोमटे,सुशांत शिंदे, आकाश येरनुळे,तानाजी माटे,ओमकार चौगुले,प्रशांत थोरात,प्रकाश भगत,फारुख गंजीवाले,अकबर तांबोळी आदी उपस्थित होते.