
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे श्री संत मारुती महाराज यांच्या पालखी रथाचे अर्पण सोहळा दि.९ गुढी पाडाव्या च्या रोजी करण्यात आला.गावातील श्री. संत तुकाराम महाराज पुरुष बचत गट कानेगाव २९ सदस्य असलेल्या गटातील सदस्यांनी मिळुन अंदाजे पाच लाख पन्नास हजार किंमतिचा रथ श्री संत मारुती महाराज मंदीर समितीकडे सोपविण्यात आला.
श्री.संत मारुती महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालखी प्रदक्षिणा,वर्षातील चार मोठ्या एकादशी निमित्त पंढरपुरी श्री.संत मारुती महाराज यांची पालखी आणि पायी दिंडीचे नियोजन या रथाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे कानेगाव ग्रामस्थ यांनी सांगितले.
त्यामुळे कानेगाव ग्रामस्थांनी श्री.संत तुकाराम महाराज पुरुष बचत गट अध्यक्ष एकनाथ कदम,सचिव संजय चौगुले,सदस्य – महादेव कुंभार,मनोज कुंभार,मनोज कदम,कालिदास गोरे,चंद्रकांत कदम,बालाजी लोभे,गोरख बोकडे,मच्छिंद्र बोकडे,महादेव कदम,विवेकानंद कदम,बाबा कदम,भरत कदम,नवनाथ भारती,मधुकर चंदनशिवे,महेश कदम,सत्यवान कदम,सुभाष कदम,धनराज कदम,विशाल जावळे,महेश चंदनशिवे,संदीप कदम,धीरज कदम,बाळासाहेब कदम,नारायण जावळे,बबलू कदम भैरवनाथ चौगुले,दत्तात्रय पांचाळ आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला.