उमरगा – लोहारा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आ.ज्ञानराज चौगुले यांनी घेतला आढावा
Post-गणेश खबोले

लोहारा(इकबाल मुल्ला)
आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शनिवार दि.15 जुन 2024 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार व उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी.बी.पारेकर यांच्यासमवेत बैठक घेऊन उमरगा लोहारा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. मागील काही दिवसांपासुन उमरगा व लोहारा तालुक्यातील काही भागात विशेषतः उमरगा शहरात गुन्हेगारीचे प्रमाणात वाढत असुन नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. या भागातील गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही. यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत करीत आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाने तातडीने पाऊले उचलुन यावर आळा घालावा, तसेच उमरगा शहरातील बेशिस्त वाहन पार्किंग व स्टॉल यांना शिस्त लावणे, वाढती वाहन चोरीची प्रकरणे यांचा छडा लावावा अशा सूचना यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केल्या आहेत. उमरगा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बांधकाम, रिक्त पदांची भरती यांसह पोलीस बांधवांच्या विविध समस्यांबाबतही यावेळी चर्चा झाली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, शहरप्रमुख योगेश तपसाळे यांची उपस्थिती होती.