शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्यात यावी – अमरराजे कदम – परमेश्वर
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्यात यावी – अमरराजे कदम – परमेश्वर
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्यात यावी या मागणीसाठी शिंदे शिवसेनेच्या वतीने दि.२९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की, सन २०१८ पासुन पावसाच्या अनियमिततेमुळे कांही ठिकाणी ओला तर कांही ठिकाण कोरडा दुष्काळ अशी शेतीची अवस्था झालेली असल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. तसेच जे पिक चांगले येते त्याला चांगला भाव मिळत नाही. अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे. या वर्षी ऑगस्ट महिनां संपला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहीले आहे. तसेच शेतकऱ्यांना सहाय्यक असलेला आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा मार्फत उभारण्यात आलेला डेअरी उद्योग गारपीट, अतिवृष्टी, भावाच्या अनिश्चिततेमुळे आणि जनावरांमध्ये पादुर्भाव आलेल्या लम्पी रोगामुळे संपुष्टात आलेला आहे. या सर्व संकटामुळे व कर्जाच्या दबावामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या दिसुन येतात.अशा स्थितीत पिक कर्जाची व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा मार्फत देण्यात आलेल्या अर्थसहाय्याची परतफेड करण्यासाठी बँका शेतकऱ्यांना कायदेशीर नोटीसा पाठवुन कायदेशीर कारवाईची धमकी देत आहेत. तरी राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतीवर आलेल्या संकटामुळे कर्जमाफी देण्यात यावी शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करावी या निवेदनावर शिवसेना धाराशिव सहसंपर्क प्रमुख, अमरराजे कदम, तालुका प्रमुख विपीन खोपडे, युवासेना उप तालुका प्रमुख अभिजीत पाटील, उप तालुका प्रमुख खंडू कुभार, शाखा प्रमुख रमेश नन्नवरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.