श्री गजानन महाराज पालखीचे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने स्वागत

श्री गजानन महाराज पालखीचे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने स्वागत
धाराशिव /न्यूज सिक्सर
धाराशिव नगरीत शेगाव येथील श्री गजानन महाराज यांच्या पालकीचे स्वागत प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आले यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वात श्री गजानन महाराज पालकीचे स्वयंसेवक तथा वारकरी मंडळी यांना केळी ,चहा,पाणी आदींचे वाटप करण्यात आले दिव्यांग बांधवांच्या वतीने केलेल्या स्वागताने परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते आलेल्या भक्तांकडून दिव्यांग व्यक्तीचे कौतुक करत होते,यावेळी संघटनेच्या वतीने धाराशिव जिल्ह्यात श्री गजानन महाराजाणी अतिशय चांगला पावसाचा वर्षाव करून शेतकरी बांधवाना उभारी द्यावी ही मनोकामना करण्यात आली यावेळी संघटनेचे जिल्हासंघटक बाळासाहेब कसबे,बाळासाहेब पाटील,संजय शिंदे, शिवकुमार माने,हरिसचंद्र मगर,सचिन जाधव,संदीप घोडके आदी पदाधिकारी उपस्थित होते….