
लोहारा-प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी येथे शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी अंगणवाडी तून पहिली देणारी सर्व मुलांची यादी संकलित करून त्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले. गावामधून विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. व विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. व महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण पुणे समग्र शिक्षा महाराष्ट्र महिला व बालकल्याण व प्रथम फाउंडेशन यांच्यामार्फत दिलेल्या सूचनानुसार पाच विकासावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. व पहिलीत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पहिले पाऊल हे पुस्तक देण्यात आले व त्याची तयारी मातांनी घ्यावी असे त्यांच्या आईंना सांगण्यात आले. याप्रसंगी गावातील पालक व महिला उपस्थित होत्या. मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी शिक्षक आनंत कानेगावकर खिजर मोरवे सुनंदा निर्मले यांनी मार्गदर्शन केले व शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे नियोजन कलशेट्टी मल्लिकार्जुन यांनी केले.