धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.
धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद
जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न धाराशिव जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेने आपल्या विविध मागण्यासाठी एक दिवसीय बंद पुकारला असून रविवार दिनांक 18 मे रोजी या बंदमुळे जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प झालेले पाहायला मिळत आहे आपल्या प्रलंबित मागण्यासाठी धाराशिव जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला असून यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील सर्वच वृत्तपत्र विक्रेते एजंट व वितरक सहभागी झाले असून धाराशिव शहर, तुळजापूर ,उमरगा ,भूम ,लोहारा, कळंब,वाशी, परांडा या सह ग्रामीण भागातील अंक वितरण पूर्णपणे बंद आहे दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलनांची आणखीन तीव्र करण्याचा इशारा धाराशीव जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून देण्यात आला आहे.