न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

प्रशासनाचे दुर्लक्ष;शासकीय जागेवर अतिक्रमण !

अतिक्रमण हटविण्याची सामाजिक कार्यकर्त्याची मागणी

प्रशासनाचे दुर्लक्ष;शासकीय जागेवर अतिक्रमण !

अतिक्रमण हटविण्याची सामाजिक कार्यकर्त्याची मागणी

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील टोल नाक्याच्या शेजारी जमीन गट नं. २११ राष्ट्रीय महामार्ग २११ च्या चौपदरीकरणासाठी भारत सरकारने संपादीत केलेल्या जमिनीवर सर्विस रोड वरती बेकायदेशीरित्या सुमन नवनाथ नवगिरे हे बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधकाम करीत असलेले बांधकाम तात्काळ थांबणे बाबत दि.१६ मे रोजी मा.जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव.,मा.उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी धाराशिव.,मा.उपजिल्हाधिकारी भूसंपादन मध्यम प्रकल्प मध्यम प्रकल्प २ धाराशिव.,मा.तहसीलदार अरविंद बोळगे, तहसील कार्यालय तुळजापूर.,मा. ग्रामसेवक चेतन्य गोरे. ग्रा.प. कार्यालय, तामलवाडी यांना सामाजिक कार्यकर्ते अंबादास बाळासाहेब वऱ्हाडे यांनी लेखी निवेदन दिले आहे.

निवेदनात असे नमूद केले आहे की,तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील टोल नाक्याच्या शेजारी जमीन गट नं. २११ नॅशनल हायवे २११ च्या चौपदरीकरणासाठी भारत सरकारे संपादीत केलेल्या जमिनीवर सर्विस रोडवर बेकायदेशीरित्या – सुमन नवनाथ नवगिरे हे बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधकाम करीत असलेले बांधकाम तात्काळ थांबवीण्यात यावे सदर संपादीत होत असलेल्या जमीन गट नं. २११ मध्ये सुमन नवनाथ नवगिरे यांचा – कोणत्याही प्रकारचा हक्क संबंध नसून तसेच त्यांच्या मालकीची जमीन सुध्दा नाही. तसेच शासनाची तसेच कोणत्याही कार्यालयाची बांधकाम परवानगी घेतलेली नाही. तरी सदर चालू असलेले बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे असे लेखी निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आले आहे.या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते अंबादास वऱ्हाडे यांची स्वाक्षरी आहे.

संबंधित विभागा कायदेशीर नोटीस बजावणार का?

शासनाच्या जागेवर अतिक्रमण म्हणजे शासनाच्या मालकीच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करणे किंवा त्यावर बांधकाम करणे अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला प्रथम कायदेशीर नोटीस पाठवून त्याला अतिक्रमण काढण्यास संबंधित विभागाने नोटीस बजावावी.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे