तुळजापूर एम डी ड्रग्ज प्रकरणात एक संशयित आरोपी ताब्यात
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर एम डी ड्रग्ज प्रकरणात एक संशयित आरोपी ताब्यात
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील एम डी ड्रग्ज प्रकरणी एका संशयित आरोपीस तामलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती शरद जमदाडे यांना या प्रकरणी पोलिसांनी तुळजापूर तालुक्यातील कामठा येथून अटक केली आहे.आरोपीला दि.१७ मे रोजी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.या प्रकरणातील ही सोळावा अरोपी अटक असून एकूण ३६ संशयित आरोंपी पैकी २० आरोपी फरार आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत योग्य पद्धतीने तपास करत आतापर्यंत १६ जणांना अटक केली आहे. त्यामधील १४ जण न्यायालयीन कोठडीत आहेत. दि. १४ फेब्रुवारी रोजी तुळजापूरला येणारे ड्रग्स तामलवाडी पोलीसांकडून पकडण्यात आले होते. सुरुवातीला तीन संशयीत आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी तपास करत या प्रकरणी आणखी ३३ आरोपी निष्पन्न केले होते. दरम्यान राज्यभर या प्रकरणाची चर्चा झाली असून पोलिसांनी दहा हजार पानाचे आरोपपत्र देखील न्यायालयात दाखल केले आहे. इतर फरार आरोपींचाही शोध सुरू असून पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे पुढील तपास करत आहेत.