नागुर येथे अवैधरित्या गौण उत्खनन करीत,धार्मिक भावना दुखावनाऱ्यावर कारवाईची मागणी
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील नागुर येथे विनापरवाना व अवैधरित्या शासकिय जमीनीतील मुरूम व खडक व इतर गौण खनिज पदार्थ उत्खनन करून शासनाचे लाखो रूपयांचे नुकसान केलेले आहे.तरी अशा अवैध रित्या धंदे करणाऱ्या वर कारवाई करावी अशी मागणी नागुर येथील अँड.शाम उद्धवराव जावळे पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक तसेच संबंधित कार्यालयाकडे निवेदना द्वारे केली आहे.
नागुर ता.लोहारा, जि.धाराशिव येथे माझ्या आजोबाच्या नावे असलेल्या व सध्या महाराष्ट्र शासनाने संपादीत केलेली जमीन गट नं. / सर्वे नं. 60 ही जमीन महाराष्ट्र शासनाने वनविभाग यांच्याकडे सदरची जमीन हस्तांतरीत करून दिलेली असुन सदर जमीन ही आज रोजी वनविभाग कार्यालय यांच्या ताब्यात असुन सदर जमीनी मध्ये विना परवानगी / रॉयल्टी न भरता विनापरवाना व अवैधरित्या शासकिय जमीनीतील मुरूम व खडक व इतर गौण खनिज पदार्थ अवैधरित्या जे.सी.बी.5 ते 6 ट्रॅक्टरच्या सहाय्याने मागील 15 दिवसापासून 5 ते 6 हजार ब्रास ट्रक्टर ट्रीप खडक / मुरूम रॉयल्टी न भरता विना परवानगी अवैधरित्या (बेकायदेशीर) उत्खनन केलेले आहे.याबाबत कळाले असता सदर जागेवरती गेलो असता.आमच्या पुर्वजांची समाधी आहे. तसेच आसरा देवाचे दरवर्षी पुजा अर्चा त्या ठिकाणी करण्यात येते.ते ठिकाण पुर्वजांच्या आठवणी आणि देवाचे श्रध्दास्थान आहे. प्रत्येक पोर्णीमेला पुजा अर्चा करीत असलेल्या सर्व बाबी अवैध धंदे करणाऱ्यांनी उत्खनन करून नष्ट केले आहे.आमच्या धार्मिक भावना दुखावल्याने मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.अवैध धंदे करणाऱ्यांला सांगितले असता जीवे मारण्याची धमकी देत आहेत.
याबाबत लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले आहे.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी पाहणी व पंचनामा करून त्या लोकांविरूध्द तात्काळ गुन्हा दाखल करून शासनाचा लाखोंचा महसुल आणि आमच्या धार्मिक भावना दुखावल्या ने दंडात्मक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती अँड.शाम उद्धवराव जावळे पाटील यांनी जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक,उपविभागीय अधिकारी,लोहारा तहसीलदार,वनपरिक्षेत्र अधिकारी,खणीकर्म अधिकारी तसेच संबंधित कार्यालयाकडे निवेदना द्वारे केली आहे.