अणदूर मध्ये नवरत्नांचा सन्मान जयमल्हार पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन

अणदूर मध्ये नवरत्नांचा सन्मान
जयमल्हार पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन
अणदूर /न्यूज सिक्सर
“अणदूर च्या मातीतच नवरत्ना ची खाण असून साता समुद्रा पलीकडे अणदूर चे नाव लौकिक पुढे नेण्याचे काम विविध क्षेत्रातून युवा पिढी करीत असल्याचा आपणास अभिमान असून,अशा रत्नांचा सन्मान जयमल्हार पत्रकार संघाने करावा ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
ते अणदूर येथील जय मल्हार पत्रकार संघाच्या दिनदर्शिका प्रकाशन व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नवरत्नांच्या सत्कार प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलत होते,या वेळी प्रमुख पाहुणे सरपंच रामचंद्र आलुरे उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, श्री श्री गुरुकुल चे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र कानडे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत हगल गुंडे उपस्थित होते.
या वेळी जयमल्हार पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले,
यावेळी वरील मान्यवरांच्या हस्ते डॉ. नितीन ढेपे वैद्यकीय, डॉ. जयप्रकाश संघशेट्टी वैज्ञानिक, डॉ. इब्राहिम नदाफ शिक्षण, प्रवीण घुगे राजकीय, विनोद घुगे पोलीस प्रशासन, शंकर दुपारगुडे पत्रकारिता, प्रसाद कुलकर्णी तहसीलदार, बाबई चव्हाण सामाजिक, विजयकुमार कांबळे बँकिंग या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नवरत्नांचा अणदूर रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच अयोध्या येथील 22 जाने च्या श्री राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमंत्रित मधुकर घुगे यांचा पण सत्कार करण्यात आला.
यावेळी रामचंद्र आलूरे,डॉ. नागनाथ कुंभार, डॉ. जितेंद्र कानडे, प्रवीण घुगे,डॉ. नितीन ढेपे, पत्रकार शंकर दुपारगुडे यांनीही जय मल्हार पत्रकार संघाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमास भगीरथ नाना कुलकर्णी, गोविंद शिंदे, मोजगे दादा, संजू जाधव, डॉ. अनिता मुदकन्ना,सीमा जोशी, शुभदा कुलकर्णी, मीरा घुगे, श्रीमंत मुळे गुरुजी, चंद्रशेखर आलुरे गुरुजी काशिनाथ शेटे, प्रबोद कांबळे, बालाजी घुगे सह ग्रामस्थ महिला पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. बी. बिराजदार, प्रास्ताविक दयानंद काळुंखे, तर आभार शिवशंकर तिरगुळे यांनी मानले,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पत्रकार अजय अणदूरकर, चंद्रकांत गुड्ड,सचिन तोग्गी, सचिन गायकवाड, शिवाजी कांबळे, संजीव आलूरे आदींनी परिश्रम घेतले