
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिनांक २ जुलै रोजी लोहारा पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक अजित चिंतले, पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्र पो.ह. राठोड,पो.ह विजय घोडके,पो. ह.ढवण आदींच्या पथकांना पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातबीदारा मार्फत काही युवक गावठी पिस्तुल व डबलबोर बाळगत असलेली माहिती मिळाली यावरून हे पथक मागणी येथे आले असता सालेगाव रणजित कालिदास यादव (वय 27 वर्ष) आणि सुरज रुपेश देशपांडे (वय वर्षे 19) यांच्या कडे गावठी पिस्टल (बंदुक) व डबलबोर चे काडतूस आणले असल्याची माहिती मिळाली त्यावरून त्यांना पंचासमोर ताब्यात घेऊन झाडाझडती केली असता त्यांच्या ताब्यात असलेली २० हजार ५०० रुपये ची गावठी पिस्टल (बंदुक) आणि डबलबोर चे काडतूस आढळून आले.यावरून त्यांच्या विरुध्द पोलीस ठाणे लोहारा येथे गुरनं १५३/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, भारतीय न्याय सहिंता कलम ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.