समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम मंजुर करुन, ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला -आ.ज्ञानराज चौगुले
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरासाठी समांतर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचासाठी 34 कोटी रुपये निधी मंजुर करुन ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला आहे, असे प्रतिपादन आ. ज्ञानराज चौगुले यांनी केले. लोहारा तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रल्पातुन महाराष्ट्र शासन सुवर्ण जयंती महाअभियान अंतर्गत लोहारा शहर समांतर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा भुमिपुजन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.11 ऑक्टोंबर 2024 रोजी माजी खा.प्रा.रविंद्र गायकवाड व आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, जिल्हा प्रमुख मोहन पणुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा. प्रा.रविंद्र गायकवाड़ होते. तर प्रमुख म्हणुन शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, नगराध्यक्षा वैशालीताई खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, ज्येष्ठ नेते नागण्णा वकील, भिमराव वरनाळे, गटनेत्या सारिका बंगले, पाणीपुरवठा सभापती शमाबी आयुब शेख, माजी गटनेते अभिमान खराडे, माजी सरपंच शंकर अण्णा जट्टे, शिवसेना नेते
राजेंद्र माळी, नगरसेवक अमिन सुंबेकर, नगरसेविका कमल भरारे, नगरसेविका शामल माळी, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेवक जालिंदर कोकणे, नगरसेवक गौस मोमिन, नगरसेविका सुमन रोडगे, नगरसेविका संगिता पाटील, नगरसेविका आरती कोरे, नगरसेविका आरती गिरी, नगरसेवक विजयकुमार ढगे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, ओम कोरे, प्रताप लोभे, उपलुका प्रमुख परवेज तांबोळी, दिपक रोडगे, शहर प्रमुख श्रीकांत भरारे, के.डी. पाटील, नगरसेवक आरिफ खाणापुरे, विनोद मुसांडे, इंद्रजित लोमटे, अशोक माळी, प्राचार्य शहाजी जाधव, शंकरराव वकील, नयुम सवार, मारुती बंडगर, बाळु कांबळे, शम्मु भोंगळे, अदि उपस्थित होते. यावेळी आ.चौगुले पुढे बोलताथा म्हणाले कि, लोहारा शहरातील नागरिकांनी शहरासाठी कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना राबविण्यात यावी, अशी मागणी केली होती. याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीकडे पाठपुरावा करुन लोहारा तालुक्यातील माकणी निम्न तेरणा प्रकल्पातुन लोहारा शहरासाठी समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी 34 कोटी रुपये निधी मंजुर करुन घेऊन आज या कामाचा भुमिपुजन सोहळा संपन्न झाला आहे. आम्ही नुसते आश्वासन देत नसतो तर दिलेला शब्द पाळत असतो, आज तो शब्द पाळला. आम्ही 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करीत असतो. आमच्याकडे कोणी काम घेऊन आले तर आम्ही त्याची जात, पात, पक्ष न बघता प्रत्येकांची अडचण सोडविण्याचे काम प्रमाणिकपणे केले आहे. लोहारा शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन विकास कामे करुन शहराला विकासाकडे नेण्याचे काम केले आहे. आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन विकास कामे मतदार संघात मोठ्या प्रमाणात केली आहेत. आम्ही विकास कामाला महत्व देत असतो, येणारी निवडणूक विकासाच्या जोरावर व तुमच्या सहकार्याने जिंकुन चौकार मारणार, असे आ.ज्ञानराज चौगुले यांनी सांगीतले. यावेळी माजी खा.प्रा.रविंद्र गायकवाड बोलताना म्हणाले कि, लोहारा शहरासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचे काम आ. ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे. पुढील काळातही लोहारा शहराच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द आहोत असे प्रतिपादन केले. यावेळी शहरासाठी समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम मंजुर केल्याबद्धल लोहारा नगरपंचायतीच्यावतीने माजी खा.प्रा. रविंद्र गायकवाड, आ.ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड यांचा जंगी सत्कार करुन ग्रामस्थांच्यावतीने आभार मानले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिमान खराडे व सुत्रसंचालन बालाजी मक्तेदार यांनी केले तर आभार गटनेत्या सारिका बंगले यांनी मानले. या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.