श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीतून निघणार मराठा वनवास यात्रा जागोजागी जनजागृती करत ही वनवास यात्रा मुंबईला पोहोचणार

श्रीतुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीतून निघणार मराठा वनवास यात्रा
जागोजागी जनजागृती करत ही वनवास यात्रा मुंबईला पोहोचणार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
येत्या ०६ तारखेला मराठा वनवास यात्रा तुळजापूर येथून निघणार आहे. ही यात्रा जवळपास ५०० किलोमीटर पायी चालत जात मुंबईत पोचणार आहे. ५०% च्या आतले ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाहीत.
चळवळीतील अग्रगण्य शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पहाडी आवाजात जंगी पोवाड्यांचा कार्यक्रम होईल. सकाळी ०९ वाजता तुळजाभवानी मातेच्या महाद्वार मंदिरासमोर पोवाड्यांचा कार्यक्रम होईल. शासकिय विश्राम ग्रह येथे दि.५ में रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषद मध्ये बोलत होते.
व्यासपिठावर योगेश केदार , सुनिल नागणे, प्रतापसिह कांचन पाटील , महेश केदार, शाम माळी, ह.भ.प तात्या महाराज लोमटे, विशाल केदार, प्रशांत कांचन पाटील , कन्ह्या लंबे, विशाल सावंत , विशाल केदार,औदुंबर खलाटे उपस्थित होते.
पुढे बोलताना योगेश केदार म्हणाले अनेक गावांतील भजनी मंडळे, हलगी पथक, संभळ वादक, वासुदेव, ढोल पथक देखील सर्व आम्हाला सोडण्यासाठी येणार आहेत. वनवासाला निघालेल्या लोकांना पाठवण्याची ती सुद्धा एक पद्धत आहे. ज्या प्रमाणे प्रभू श्रीराम वनवासाला निघाल्या नंतर त्यांना सोडण्यासाठी हजारोंच्या संख्येने अयोध्या वासिय उपस्थित होते. अगदी त्याच प्रमाणे मराठा समाजातील वनवासाला निघालेल्या मराठा समाजातील तरुणांना सोडण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाज उपस्थित राहील.
वाटेत देखील प्रत्येक गावातील लोक आमच्या राहण्याची जेवणाची सोय करत आहेत. जागोजागी जनजागृती करत ही वनवास यात्रा मुंबई पर्यंत पोचेल. आम्ही ओबीसी आरक्षण तर मिळवूच. पण अजुन एक गोष्ट निश्चित आहे की, या मुळे महाराष्ट्राला एका वैभवशाली परंपरेची प्रत्यक्ष माहिती होऊन जाईल.
उन्हाळ्याचा विचार करता, ही वनवास यात्रा पहाटे ०५ ते सकाळी १० पर्यंत आणि संध्याकाळी ०५ ते रात्री ०८ या वेळेत चालणार आहे. सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत आराम केला जाईल. आयोजित केलेल्या पत्रकार परिषद मध्ये बोलत होते.