भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकुर यांची ॲड.खंडेरावजी चौरे यांच्या चिरंजीव सौरभ चौरे यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती
Post-गणेश खबोले

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनीधी
ओ.बी.सी. मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड.खंडेरावजी चौरे यांचे चिरंजीव सौरभ चौरे व देविदास कंदरफळे यांची मुलगी चि.सौ.कां.पुजा यांचा विवाह सोहळा धाराशिव शहरातील
हातलाई मंगल कार्यालयात दि.13 जुलै 2024 रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंहजी ठाकूर यांनी उपस्थित राहुन नवदाम्पत्यांस शुभाशिर्वाद दिले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य पाटील, भाजपा नेते मिलिंद पाटील, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.अनिल काळे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.व्यंकट गुंड, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेसिंहा राजेनिंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार देविदास पाठक, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, माजी नगरसेवक प्रविण पाठक, भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, मंडळ अधिकारी जगदिश लांडगे, माजी आ.सुजितसिंह ठाकुर यांचे स्विय सहायक हिमालय वाघमारे, अनिल ईतापे, अदि उपस्थित होते.