अणदूर गावाच्या विकासकामांसाठी एक कोटींचा निधी उपलब्ध करून देणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील

अणदूर गावाच्या विकासकामांसाठी एक कोटींचा निधी उपलब्ध करून देणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील
अणदूर/न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असलेल्या अणदूर गावच्या विकासकामांसाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे व गावातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शनिवारी (दि.१५) भेटीस आलेल्या ग्रामस्थांना दिले.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक आलूरे यांनी गावातील जेष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते,युवक,शेतकरी व विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर निवड झालेल्या मान्यवरांची भेट करवून दिली.यावेळी आमदार पाटील यांनी तीर्थक्षेत्र, शैक्षणिक व राजकीय असे अणदूर गावचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.यापूर्वी गावासाठी दोन रस्ते, तीन सभागृह दिले आहेत. या सह गावातील विविध विकासकामे अपूर्ण आहेत या कामाला गती देण्यासाठी येत्या काळात एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे अभिवचन भेटीला गेलेल्या शिष्टमंडळाला दिले.पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, गावातील जेष्ठांनी एकत्रित येऊन गावाचा विकासाची चर्चा करावी.
यावेळी आमदार पाटील यांना गावातील विविध विकासकामांची माहिती देण्यात आली. यात तालीम, जिम,अंतर्गत व मुख्य रस्ते,हुतात्मा स्मारक सुशोभीकरण यासह तांडे व वस्ती सुधारणा याबाबत सविस्तर माहिती दिली यावर आमदार पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दीपक आलूरे, शहर अध्यक्ष दीपक घोडके,युवा नेते दयानंद मुडके,युवा मोर्चा शहर अध्यक्ष आनंद मुळे,अरविंद आलूरे,बालाजी कुलकर्णी,सेवा सोसायटीचे संचालक गुंडेशा गोवे, चंद्रशेखर कंदले जेष्ठ नागरिक नीळकंठ करपे,रमेश घोडके-पाटील,शिवानंद तोग्गी,राजकुमार गोवे,मेजर अनिल घुगे,गुंडूसिंग राजपूत, लक्ष्मण हागलगुंडे,अनिल घुगे, इमाम शेख,नवनाथ मिटकरे,प्रवीण घोडके, निलेश आलूरे, शिवकुमार बिराजदार आदींसह मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी आमदार पाटील यांची भेट घेतली.