पत्रकारांनी निपक्षपाती निर्भिडपणे वास्तविक लिखाण करावे-प्रा.आर.आर.सोनकांबळे

पत्रकारांनी निपक्षपाती निर्भिडपणे वास्तविक लिखाण करावे-प्रा.आर.आर.सोनकांबळे
नळदुर्ग /न्यूज सिक्सर
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सामान्य माणूस पत्रकाराकडे एका वेगळ्या अपेक्षेने बघतो तेंव्हा पत्रकारानी निपक्षपाती निर्भयपणे लिखाण करून ग्रामीण भागातील विकासाला चालणा देण्याचे काम करावे असे प्रतिपादन प्रा.आर.आर.सोनकांबळे (पुणे) यांनी नळदुर्ग ता.तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
पैलवान रेवाप्पा सोनकांबळे क्रिडा प्रतिष्ठान नळदुर्गच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या नुतन कार्यकारिणीसह ग्रामीण भागातील पत्रकारांच्या सत्कार समारंभाचे आयोजन नळदुर्ग येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात करण्यात आले होते.यावेळी प्रा.आर.आर.सोनकांबळे हे अध्यक्षिय स्थानावरून बोलत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारूती बनसोडे म्हणाले की, ग्रामीण भागातील पत्रकारिता अधिक सक्षम करण्यासाठी वेळोवेळी पत्रकाराकरिता कार्यशाळा आयोजित करणे काळाची गरज आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित शिक्षक भारतीचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार भैरवनाथ कानडे यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले.
प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अरूण लोखंडे, उपाध्यक्ष किशोर धुमाळ, कार्याध्यक्ष विजय पिसे,प्रसिद्धीप्रमुख ईरफान काझी, सल्लागार एस.के.गायकवाड,संघाचे मंत्रालयीन प्रतिनिधी प्रकाश गायकवाड, पत्रकार दयानंद काळूंके,प्रविण राठोड,दिपक मस्के,मिलिंद गायकवाड आदीं पत्रकारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपादित बहिष्क्रत भारत व मूकनायक या व्रत्तपत्राच्या संग्रहीत प्रति महाराष्ट्र शासनाने ग्रंथ रुपात प्रकाशित कलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक हा ग्रंथ, फेटा व गुलाब पुष्प देऊन येथोचित सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी अँड. शांतीबल कांबळे, अँड.मारुती शिंदे,जेष्ठ कार्यकर्ते शाम कांबळे,युवा कार्यकर्ते नरेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.