स्ञीशक्ती देवतेच्या नगरीत महिलांना मिळतो जय अंबिका गणेश मंडळाच्या वतीने आरतीचा मान !
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी

स्ञीशक्ती देवतेच्या नगरीत महिलांना मिळतो जय अंबिका गणेश मंडळाच्या वतीने आरतीचा मान !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
स्ञीशक्तीदेवता श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावन नगरीत महिला वर्गास श्री गणेशाची आरती करण्याचा मान मिळु लागला आहे. या मुळे स्ञीपुरुष समानता चळवळीला बळ प्राप्त झाले आहे. श्रीगणेश उत्सवात केंद्राने महिला वर्गास तेहतीस टक्के आरक्षण दिले व आता श्रीगणेशाचा आरतीचा मान मिळु लागला आहे या पुर्वी महिला वर्ग श्रीगणेश उत्सवात अर्थवशेषपठण म्हणण्या पुरतेच महिलांना स्थान होत माञ आता पुरुषांन बरोबर मान सन्मान मिळण्यास आरंभ झाला आहे.
महाराष्ट्रात महिलांना राज्यकर्ते होण्याचा मान मिळु लागला तिर्थक्षेञ तुळजापूर नगरीचा कारभार तर ब-याच वर्षा पासुन महिला वर्ग पाहतो आहे हे आरक्षण मुळे शक्य झाले आता केंद्राने महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिल्याने महाराष्ट्रातील आरक्षणाला आणखी बळकटी आली आहे. जय अंबिका गणेश तरुण मंडळ कमान वेस येथील गणेश मंडळांचा महिलांसाठी उपक्रम शेकडो महिलांच्या हस्ते श्री गणेशाची महाआरती करण्यात आली. या वेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील. व मंडळाच्या महिला सभासद सौ अलका कदम.भाग्यश्री लोंढे. अश्विनी कदम , गौरी पेंदे , पूजा लोंढे. मयुरी परदेशी , श्रुती लोंढे ,साक्षी झाडपिडे , संजीवनी बर्वे , मंगल कदम , लक्ष्मी भिसे ,स्नेहल इंगळे यांनी परिश्रम घेतले .मंडळाने हा उपक्रम घेतल्या बद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
या प्रसंगी प्रभागातील जेष्ठ नागरिक,महिला व युवक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.