न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्र

२१ ऑक्टोबर ला होणार कोपरगावच्या गोदावरी काठी कलश पूजन

२१ ऑक्टोबर ला होणार कोपरगावच्या गोदावरी काठी कलश पूजन

कोपरगाव शहर प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या चला जाणूया नदीला या मोहिमेअंतर्गत देशाच्या  अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ नद्या अमृतवहिनी करण्याची मोहीम हाती घेतली असून त्या अंतर्गत अगस्ती या नदीच्या परिक्रमा साठी कोपरगाव येथील गोदावरी नदी किनारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दि २१ ऑक्टोबर रोजी कलश पूजन होऊन सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या चला जाणूया नदीला या उपक्रमा अंतर्गत जलबिरारदरी आणि महाराष्ट्र शासन संयुक्त विद्यमाने देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ नद्यां अमृतवाहिनी करण्याचा मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अगस्ती ऋषीच्या अंकाई टंकाई या डोंगरावर उगम पावणाऱ्या व पुढे चालून कोपरगाव तालुक्यातुन वाहणाऱ्या पवित्र अशा दक्षिण गंगा गोदावरी नदीस सोनारी येथे मिळणारी अगस्ती नदीची परिक्रमा आणि अभ्यास दौरा करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे व नदी अभ्यासक डॉ वसुदेव साळुंखे यांची निवड करण्यात येऊन वर्धा येथे जलआभ्यासक डॉ. राजेंद्र सिंग यांनी कलश व तिरंगा देऊन या मोहिमेला सुरुवात करून दिली असुन या  अगस्ती नदी परिक्रमा समितीचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व समितीच्या सचिव जिल्हा वन अधिकारी सुवर्णा माने यांच्या हस्ते कलश आणि तिरंगा ध्वजाचे औपचारिक अनावरण करत त्या संबंधी नियोजन बैठक संपन्न होऊन या बैठकीत शुक्रवार दि *२१ ऑक्टोबर रोजी कोपरगाव येथे गोदावरी नदी काठावर कलश पूजन व गोदावरी मातेचे पूजन शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, सिने अभिनेते व या उपक्रमाचे ब्रँड अँबेसिडर चिन्मय उदगीरकर, या मोहिमेचे महाराष्ट्र समन्वयक  राजेश पंडित यांच्यासह विविध मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित केला आहे

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे