ब्रेकिंगमहाराष्ट्र
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अरोपीवर गुन्हा दाखल
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अरोपीवर गुन्हा दाखल
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर येथील सतीश गंगाराम कदम (वय ७३) यांनी विषारी गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद सतीश कदम (वय ३०) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किसन भाउराव डोंगरे, गणेश उर्फ गणराज किसन डोंगरे, नागेश किसन डोंगरे (सर्व रा. तुळजापूर) यांनी मयत सतीश कदम व त्यांच्या मुलाची भेट घेवून एकत्रित घेतलेल्या जमिनीवर प्लॉट विक्रीच्या संमती पत्रावर सही करा असे म्हणून मानसिक त्रास दिल्याने त्यांच्या जाचास व त्रासास कंटाळून सतीश कदम यांनी आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.