ब्रेकिंग
शिक्षक एस एम शेख यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

लोहारा / प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा (रवा) येथे शिक्षक एस एम शेख यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळुन शाळेतील २२० विद्यार्थ्यांना चित्रकला वही व वह्यांचे वाटप करण्यात आले.
शिक्षक एस एम शेख गेल्या पाच वर्षांपासून शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करतात.यावेळी हिप्परगा सरपंच अभिमान कांबळे,उपसरपंच विजय लोमटे, कार्यालयीन विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, लोहारा बीट विस्तार अधिकारी चव्हाण, माजी सरपंच राम मोरे,राजेगाव जि प शाळा मुख्याध्यापक दिपक पोतदार,मुख्याध्यापिका उलन कांबळे, शिक्षक सुधीर घोडके,गोविंद जाधव,नागेश बंगले, संभाजी परिट ,स्वाती राठोड ,स्वाती बिडवे,आशपाक शेख,इरफान सय्यद व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.