तीर्थ बुद्रुक वैराग्यधाम येथे १६ फेब्रुवारी रोजी मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना व कळसा रोहण कार्यक्रम- केदारपीठ जगद्गुरु
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तीर्थ बुद्रुक वैराग्यधाम येथे १६ फेब्रुवारी रोजी मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना व कळसा रोहण कार्यक्रम- केदारपीठ जगद्गुरु
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक वैराग्यधाम येथे दिनांक १६ फेब्रुवारी रोजी लिंजगद्गुरु श्री सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कळसा रोहण कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती केदारपीठाचे जगद्गुरु श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांनी दि.१२ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत मध्ये बोलताना सांगितले, यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
की केदारपीठाचे पूर्वीचे जगद्गुरु यांची या ठिकाणी समाधी असून या समाधी मंदिरामध्ये दिनांक १६ फेब्रुवारी रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कळसा रोहण कार्यक्रम होणार असून यावेळी रंभापुरीचे पीठाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु वीर सोमेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, या निमित्त दिनांक १४ ते १५ व १६ फेब्रुवारी पर्यंत होम हवन, धर्मसभा, विश्वशांती महायज्ञ समारंभ संपन्न होणार आहे, या ठिकाणी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ६५ रूम , व परिसरातील लोकांच्या सोयीसाठी अल्प दरात मंगल कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले आहे, दिनांक १६ फेब्रुवारी रोजी धर्मसभा होणार असून यावेळी
या कार्यक्रमास देशातील विविध मठाचे शिवाचार्य गण सह अनेक राज्यातील राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहतील तसेच वीस ते पंचवीस हजार भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे असे जगद्गुरुनी सांगितले, यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्रे, संयोजन समितीचे आप्पासाहेब पाटील, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, ,गुरुनाथ बडूरे, किशोर स्वामी राजाभाऊ मुंडे ,बालाजी पांडागळे, श्रीकांत साखरे ,लक्ष्मण ऊळेकर ,राजू एकलारे, महादेव तोडकरी ,प्रफुल मस्के आदी उपस्थित होते,