न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

गणेशभक्तांनो, गुलाल टाळा अन् फुले पाकळ्या उधळा…! उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी , तुळजापूर

गणेशभक्तांनो, गुलाल टाळा अन् फुले पाकळ्या उधळा…!

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

लाडक्या बाप्पाचे स्वागत आणि निरोप देताना गुलालाची उधळण केली जाते. याच गुलालात कचखडी, बारीक कण, कैमिकल असतात. ते कान, डोळे, नाक, तोंडात गेल्यावर घातक ठरू शकते. शिवाय याच गुलालामुळे दोन समाजात तेढही निर्माण होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी गणेशभक्तांनी गुलालाऐवजी फुले किंवा फुलांच्या पाकळ्या गणेशमूर्तीला अर्पण कराव्यात, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तुळजापूर डॉक्टर निलेश देशमुख केले आहे.लाडक्या गणरायाचे मंगळवारी आगमन झाले. यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. असे असतानाही गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे आनंदात आणि जल्लोष करत स्वागत केले.

यावर्षीचा गणेशोत्सव डीजेमुक्त आणि गुलालमुक्त करावा. डीजेऐवजी पारंपरिक वाद्य आणि गुलालाऐवजी फुलांची उधळण करावी, असे आवाहन केले आहे. यासंदर्भात , अधिकाऱ्यांनाही बैठका घेऊन आवाहन करण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर डॉ निलेश देशमुख दिल्या.शांतता ठेवून धाराशिवकरांनी आतापर्यंत आदर्श घालून दिला आहे. सर्व सण, उत्सव मिळून साजरा केले जातात. यापुढेही नागरिकांनी असेच आनंदी राहून पोलिसांना सहकार्य करावे. शांततेत साजरा होणाऱ्या उत्सवाला विरोध नाही; पण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर आम्ही कारवाई करणार. गणेशोत्सव, शारदीय नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने आचारसंहिता जाहीर केली आहे. सर्व गणेशभक्तांनी यावर्षीचा गणेशोत्सव डीजेमुक्त साजरा करावा. तसेच शक्य झाले तर गुलालाऐवजी फुले किंवा फुलांच्या पाकळ्यांची उधळण करावी.सामाजिक ऐक्याचा परिचय देत सण उत्सव साजरे करा…गणेश मंडळांनी आणि ईद-ए-मिलाद. सामाजिक सलोखा व आपली संस्कृती टीकुन ठेवावी.. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख यांनी आवाहन केले आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे