माणुसकी व प्रामाणिकपणा जिवंत:युवकाचा प्रामाणिकपणा; सापडलेला मोबाईल व पर्स केली परत

माणुसकी व प्रामाणिकपणा जिवंत:युवकाचा प्रामाणिकपणा; सापडलेला मोबाईल व पर्स केली परत
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
आजकालच्या काळात दुसऱ्याचे ओरबाडून खाण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. तरीही समाजात अजूनही माणुसकी व प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे कुठे ना कुठे तरी दिसून येते. असेच एक उदाहरण समोर आले आहे.एका युवकाला १२ हजार किंमतीचा मोबाइल व पर्स सापडली असता त्याने प्रामाणिकपणा दाखवत सापडलेली ती पर्स पोलिसांच्या स्वाधीन केली.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील
सावता कोंडीबा माळी देविचे दर्शन करू कामठा या गावी दि. ७ मार्च रोजी १ च्या सुमारास उस्मानाबाद कणे स्टॉप तुळजापूर परिसर भागातून जात असताना त्यांची पर्स हरविली, हरवलेल्या पर्समध्ये ३०० रुपये तसेच व्हि ओ कंपनीचा १२००० हजाराचा मोबाइल होता.
ही पर्स तुळजापूर येथील योगेश कदम रा. हडको याला सापडली. त्याने ही पर्स तुळजापूर पोलिस ठाण्यात जमा केली. चौकशीनंतर ही पर्स सावता माळी यांना परत करण्यात आली. या घटनेच्या निमित्ताने प्रामाणिकपणा दाखवलेल्या योगेश कदम याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पर्स परत करताना पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद, बिटअम्लदार संतोष करवार, पोलिस उपनिरिक्षक बसवेश्वर चनशेट्टी, योगेश कदम,पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, सावता माळी सह कुंटूंब आदि उपस्थित होते