सेवानिवृत्त शाखा अभियंता गणी शेख यांचा भातागळी ग्रामस्थांच्यावतीने शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले,युवानेते किरण गायकवाड यांच्या उपस्थितीत सत्कार
Post-गणेश खबोले

लोहारा(प्रतिनिधी)
लोहारा तालुक्यातील भातागळी येथील रहिवाशी शाखा अभियंता गणी सलीम शेख सार्वजनिक बांधकाम विभाग (मुंबई) सेवानिवृत्त झाल्याने भातागळी ग्रामस्थांच्यावतीने महादेव मंदिराच्या प्रांगणात दि.१४ फेब्रुवारी रोजी सेवापूर्ती समारंभ सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुषमाताई माने होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेना उपनेते माजी आ. ज्ञानराज चौगुले, शिवसेना युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुर्यवंशी, महादेव मंदिर अध्यक्ष संजय पाटील, राष्टवादी कॉग्रेस प्रदेश सरचिटणीस मुर्तुजखान, मोईन हाश्मी, शिवसेना नेते राजेंद्र माळी, उज्वल कुलकर्णी, नगरसेवक अविनाश माळी, अदि उपस्थित होते. यावेळी शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना नेते राजेंद्र माळी, अरुण रोडगे, हळसपुरे, नगरसेवक अविनाश माळी, ग्रामपंचायत, मित्र, परिवार यांच्या वतीने सेवानिवृत्त शाखा अभियंता गणी शेख यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेते माजी आ.ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना नेते राजेंद्र माळी यांनी यावेळी गणी शेख यांनी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती सांगीतली. तसेच सेवानिवृत्त शाखा अभियंता गणी शेख यांनी आपण केलेल्या कार्याची माहिती सांगुन सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास माजी सरपंच प्रविण पाटील, अरुण जगताप, अरुण रोडगे, हाळसपुरे, ग्रामविकास अधिकारी दत्ता पवार, दत्ता वाघमारे, अमोल ओवांडकर, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, माजी सरपंच आप्पासाहेब पाटील, पं.स.माजी सदस्य इंद्रजित लोमटे, बालाजी बाबळे, सहदेव गोरे, ग्रामपंचायत सदस्य नारायण क्षीरसागर, अमोल ओवांडकर, जितु कदम, तुकाराम जाधव, विशाल कोकाटे, विशाल जगताप, यांच्यासह ग्रामस्थ, मित्र परिवार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयसिंह पाटील यांनी केले.