शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत अमिन सुंबेकर यांनी स्वीकारला उपनगराध्यक्ष पदाचा कारभार
Post-गणेश खबोले

लोहारा(प्रतिनिधी)
लोहारा नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदाचा पदग्रहन सोहळा नगरपंचायत कार्यालयात दि१४ फेब्रुवारी रोजी पार पडला. शिवसेना उपनेते माजी आ. ज्ञानराज चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुर्यवंशी, नगराध्यक्षा वैशालीताई खराडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शब्बीर गवंडी, माजी गटनेते अभिमान खराडे, शिवसेना नेते राजेंद्र माळी, गटनेत्या सारिका बंगले, शिवसेना तालुका उपप्रमुख परवेज तांबोळी, अरुण जगताप, नगरसेविका कमलताई भरारे, नगरसेविका शामल माळी, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेवक गौस मोमिन,युवासेना चे श्रीकांत भरारे,पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, के.डि.पाटील, ओम कोरे, नगरसेवक आरिफ खाणापुरे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, माजी पं.स. सदस्य इंद्रजित लोमटे, माजी सरपंच आप्पासाहेब पाटील, बालाजी बाबळे, सहदेव गोरे, देवा महाजन, नयुम सवार, आब्बास शेख, भगवान मक्तेदार, बाळु कांबळे, सौदागर रणशुर, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.