तुळजापूर विधानसभेसाठी राजकीय भूमिका करणार जाहीर…!
मराठा समाजाची आज बैठक ..! कोणाला पडायचं अन् कोणाला निवडून आणायचे !

मराठा समाजाची आज बैठक ..!
कोणाला पडायचं अन् कोणाला निवडून आणायचे !
तुळजापूर विधानसभेसाठी राजकीय भूमिका करणार जाहीर…!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे – पाटील यांच्या आदेशानुसार पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आज दि.१२ नोव्हेंबर रोजी दुपारी १.०० वाजता लातूर रोड नवीन बस स्टँड च्या समोर महत्वपूर्ण बैठक आयोजित केली असून, तुळजापूर विधानसभेसाठी मराठा समाज एकत्र यवून भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती मराठा समाजाचे सज्जनराव साळुंके यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या वतीने दिलीमराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सज्जनराव साळुंके यांनी उमेदवारी मागणी केली होती.
जरांगे पाटील यांनी निवडणुकीत माघार घेतल्या नंतर त्यांच्या सुचणेप्रमाणे उमेदवारी अर्ज मागे घेतला. सकल मराठा समाजाच्या वतीने एक उमेदवार देऊन, तो निवडणून आणण्याचा एक विचार समोर आला. मराठा समाजाने प्रामाणिकपणे प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने अद्याप समाजाचा निर्णय होऊ शकला नाही. सकल मराठा समाजाचे धोरण व सामाजिक परिस्थिती लक्षात घेता ते अद्याप तुळजापूर विधानसभेच्या रणसंग्रामात उतरले नाहीत. एक मत होण्याची शक्यताही दिसत नसल्याने आज पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक यांच्याशी संवाद साधून राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.