अग्निपथ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या व्यक्तीमत्व विकास शिबीर उत्साहात संपन्न

अग्निपथ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या व्यक्तीमत्व विकास शिबीर उत्साहात संपन्न
अणदूर /न्यूज सिक्सर
अग्निपथ बहुउद्देशीय सामाजिक संस्था , अणदूर* च्या वतीने दिनांक.२७ मे वार शनिवार रोजी आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न
नुकत्याच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अग्निपथ संस्थेचा हा पहिलाच कार्यक्रम होता. सामाजिक ,शिक्षण,सांस्कृतिक, महिला,युवा,आरोग्य,बालसंस्कार आशा विविध विषयाला घेऊन आगामी काळात काम करणारी संस्था उदयास येत आहे.
शिक्षण व सामाजिक यांची सागड घालणारा हा *व्यक्तिमत्त्व विकास शिबीर* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री.सिद्धेश्वर गोरे साहेब (सहाय्यक पोलीस निरीक्षक ,नळदुर्ग) तसेच संस्कृत भारतीचे प्रदेशसहमंत्री गौरीशंकर धुमाळ सर , सुयश कोचिंग क्लासेस चे मल्लिनाथ लंगडे सर ,रामशेट्टी पाटील सर , ज्ञानसागर कोचिंग क्लासेस चे युवराज कर्पे सर व श्री कोचिंग क्लासेस चे बसवराज निसरगुंडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. श्री गोरे सर यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन, क्रीडा,परिवार,कला व समाजात चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे असे सांगितले. गौरीशंकर धुमाळ सर यांनी विद्यार्थी हा कष्टाळू आहे.कोणत्याही परिस्थिती वरती मात करून आपण मोठे यश संपादन करू शकतो.चारित्र्यसंपन्न विद्यार्थी होणे ही आजच्या काळाची गरज आहे. या सोबतच अनेक उदाहरणे देऊन सरांनी शिक्षण- पालक- विद्यार्थी या तिन्ही विषय मांडले , या कार्यक्रमारासाठी १० व १२ मधील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश चिनकरे यांनी केले तर प्रस्थाविक राजकुमार गाढवे यांनी केले.या कार्यक्रमासाठी ,केदार पाटील,तुळशीराम घोडके, खंडु टिकम्बरे,विवेकानंद कुंभार तसेच विद्यार्थी मोठे संख्येने उपस्थित होते.