न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

उमरगा विधानसभा निवडणूक जनहित लोकशाही पार्टीचे पत्रकार उमेश सुरवसे यांची उमेदवारी वैद्य

Post-गणेश खबोले

 

उमरगा (प्रतिनिधी)

२४० उमरगा अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघ निवडणुकांत उमरगा तालुक्यातील पेठ सांगवी येथील रहिवासी व पत्रकार तरुण आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु व रिपब्लिकन सेना सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांचे विश्वासु जवळचे कार्यकर्ते म्हणुन उमेश ज्ञानदेव सुरवसे यांची ओळख आहे यांनी जनहित लोकशाही पार्टी कडुन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

उमेश सुरवसे यांनी उमरगा तहसील व उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय समोर सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध आंदोलने केली आहेत.दलित चळवळीत सक्रिय काम करत असताना त्यांनी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पेठ सांगवी गावचे शाखाध्यक्ष म्हणून २००२ ते २००६ पर्यंत काम केले आहे तर रिपब्लिकन युवा तालुकाध्यक्ष म्हणून २००६;ते २००९ पर्यंत काम केले आहे.तसेच दारूबंदी साठी १४ वेळा आंदोलने करून सहा वर्ष गावातील दारू बंद करण्यास यशप्रप्त मिळाले होते तर २००९ पेठ सांगवी ग्रामपंचायत निवडणूक मध्ये बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली. या पक्षात काम केले तर पुढे भारतीय बौध्द महासभा जिल्हा पदावर २०१४ ते २०२४ पर्यंत कार्यरत आहे तर २०१७ पासुन रिपब्लिकन सेना पक्षाचे काम केले तसेच आनंदराज आंबेडकर साहेब यांचे उमरगा लोहारा तालुक्यातील जवळचे कार्यकर्ते म्हणुन उमेश सुरवसे यांची ओळख आहे तर २०१९ मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु आनंदराज आंबेडकर साहेब यांचा भव्य मिरवणुक काढण्यात आली होती.
तर पेठ सांगवी गावात २०२४ मध्ये सम्यक बुद्ध विहार साठी जागा अधिग्रहीत करण्यात आली तर २०२३ मध्ये बुध्दविहार साठी ३०० बाय ३०० ची जागा भोगवट्यामध्ये घेण्यात आली आहे.
तसेच २०१६ मध्ये माजी आमदार जोगेंद्र कवाडे सर यांच्या हस्ते बुध्द विहार चे उद्घाटन करण्यात आले होते.तर उमेश सुरवसे हे २००९ ते १४ पर्यंत बिनविरोध सदस्य म्हणुन काम पाहिले आहे.तर २०२१ते चालु आई सविता सुरवसे ह्या बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य आहेत तर भारतीय बौध्द महासभा च्या माध्यमातून उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात सर्वच गावात एक वेगळी ओळख आसल्यामुळे आणी आंबेडकरी चळवळीतील केंद्र असलेल्या उमरगा येथे आनंदराज आंबेडकर यांची सभा झाली तर मोठ्या प्रमाणात उमेश सुरवसे यांना मते मिळु शकतात .

उमेश सुरवसे हे एक उच्चशिक्षित तरून तडफदार आहेत पत्रकार आहेत जनतेच्या प्रश्नाची उकल करणारे नेतृत्व उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातुन विजयी होण्यासाठी महत्त्वाचे उमेदवारी मानली जात आहे .

जनहित लोकशाही पार्टी चे उमेश सुरवसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तो वैद्य ठरला.जनहित लोकशाही पार्टी चे उमेदवार उमेश सुरवसे यांच्या उमेदवारीने २४० उमरगा अनुसूचित जाती मतदार संघात कोण पडणार कोण विजयी होणार कोणाचा फायदा कोणाला होणार यांची मांडणी संध्या व चर्चा जोरात चालु आहे तर उमेश सुरवसे यांच्या उमेदवारीने कोणाला झटका बसणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे