श्री येडेश्वरी देवी मंदीर परिसरात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकारातुन राबविण्यात आले स्वच्छतस अभियान पोलीस अधीक्षक यांच्या या संकल्पनेचे येरमाळा गावकऱ्यांनी केले कौतुक

श्री येडेश्वरी देवी मंदीर परिसरात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकारातुन राबविण्यात आले स्वच्छतस अभियान
पोलीस अधीक्षक यांच्या या संकल्पनेचे येरमाळा गावकऱ्यांनी केले कौतुक
येरमाळा/न्यूज सिक्सर
नुकतेच श्रीक्षेत्र येरमाळा येथे संपन्न झालेली श्री येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रेत लाखोंच्या संख्येत भाविक दर्शना करीता आले होते. यात्रा कालावधीत आलेल्या भाविकांमुळेमंदीर परिसर व येरमाळा गावात मोठ्या प्रमाणात घनकचरा इतरत्र पडलेला होता. घनकचऱ्यापासून रोगराई पसरु नये तसेच यात्रा परिसर स्वच्छ व्हावे या संकल्पनेतुन मा.पोलीस अधीक्षक उस्मानाबाद श्री अतुल कुलकर्णी यांनी पुढाकार घेवून मॉजे येरमाळा, ता. कळंब येथील श्री येडेश्वरी देवी मंदीर परीसरातील दि.16.04.2023 रोजी सकाळी 06.00 वा ते 11.00 वा कालावधीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
सदर स्वच्छता अभियान राबविण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या आवाहनाला आर्ट ऑफ लिव्हींग, संत निंरकारी मिशन, येडाई व्यसनमुक्ती केंद्र, येडेश्वरी ट्रस्ट व ग्रामपंचायत येरमाळा यांनी भ्रभ्रुन प्रतिसाद देवून यांचे संयुक्त विद्यमाने 20 ट्रॅक्टर घनकचरा संकलीत करण्यात आला.
पोलीस अधीक्षक यांचे या संकल्पनेचे येरमाळा गावकरी यांनी कौतुक केले आहे.
पोलीस अधक्षीक यांनी स्वच्छता अभियान मध्ये सहभागी आर्ट ऑफ लिव्हींग, संत रिंकारी मिशन, येडाई व्यसनमुक्ती केंद्र, येडेश्वरी ट्रस्ट, ग्रामपंचायत येरमाळा व पोलीस ठाणे येरमाळा यांचे आभारव्यक्त करुन पुढेही पोलीस विभाग कडून राबविण्यात येणारे विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.