धाराशिव तालुक्यातील बामणी येथील दुचाकीवरुन चिवरी येथे दर्शनासाठी जाणारे दांपत्य कारच्या धडकेत ठार
धाराशिव तालुक्यातील बामणी येथील पती-पत्नी जागीच मृत्यू

धाराशिव तालुक्यातील बामणी येथील दुचाकीवरुन चिवरी येथे दर्शनासाठी जाणारे दांपत्य कारच्या धडकेत ठार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव तालुक्यातील बामणी येथील चिवरी येथील महालक्ष्मीला नैवेद्य नारळ करण्यासाठी दुचाकीवरून दर्शनासाठी जाणाऱ्या पती-पत्नीच्या दुचाकीला लातूरहून भरधाव वेगाने आलेल्या होंडा सिटी कारने जोराची धडक देत चिरडल्याने पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील तुळापूर तालुक्यातील खंडाळा पाटीवर रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
अपघातात मृत्यू
धाराशिव तालुक्यातील बामणी येथील कालिदास महादेव गुजर वय वर्ष ५०, राजूबाई कालिदास गुजर वय वर्ष ४५ हे दांपत्य रविवारी दि.४ ऑगस्ट रोजी तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी देवीला नैवेद्य नारळ करुन दर्शनासाठी दुचाकीवरून (क्र. एम.एच.२५ ए. जी. ५७३४) खंडाळा मार्गे चिवरीकडे जात होते. ते खंडाळा
पाटीजवळ आले असता तोडलेल्या दुभाजकावरून त्यांची दुचाकी रस्ता ओलांडत असताना लातूरहून तुळजापूरकडे भरधाव जाणाऱ्या होंडा सीटी कारने (क्र. एम.एच.१४ के. जे. ३०२०) जोरात धडक दिली. यात दुचाकी १० ते १५ फूट फरफटत गेली. यामुळे दुचाकीवरील दांपत्य चिरडले गेल्याने आणि जागीच ठार झाले. या दांपत्यावर रात्री उशिरा बामणी गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.