कारगिल विजय सर्व शाळा व महाविद्यालयात साजरा करण्याची मागणी

कारगिल विजय सर्व शाळा व महाविद्यालयात साजरा करण्याची मागणी
धाराशिव /न्यूज सिक्सर
कारगिल विजय दिन 26 जुलै हा दिवस संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयात ध्वजारोहण करून साजरा करावा; राष्ट्रवादी माजी सैनिक सेल तालुका तुळजापूर ची तुळजापूर गट शिक्षणाधिकारी यांना मागणी.
आज दिनांक 19 जून वार सोमवार रोजी राष्ट्रवादी माजी सैनिक सेल तालुका तुळजापूर च्या वतीने *कारगिल विजय दिवस 26 जुलै* हा दिवस धाराशिव जिल्ह्यातील व तुळजापूर तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालये येथे ध्वजारोहण करून साजरा करावा.
कारण 1999 साली झालेल्या कारगिल युद्धात आपल्या जवानांनी अदम्य साहस ,बलिदान ,व आपल्या संसाराचा त्याग करून पाकिस्तानला पराभूत करून विजय मिळविला त्या जवानांचे बलिदान आदर्श लक्षात घेऊन प्रशासनाने कारगिल विजय दिनी शाळा व महाविद्यालये या ठिकाणी ध्वजारोहन करून विद्यार्थ्यांना कारगिल दिनाचा इतिहास सांगावा.असे निवेदन तुळजापूर तालुका उप गट शिक्षणाधिकारी श्री एम एस स्वामी यांना देण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी माजी सैनिक सेल धाराशिव जिल्हाअध्यक्ष दत्ता नवगिरे ,माजी सैनिक विठ्ठल लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे,दादा खबोले असे अनेक
माजी सैनिक उपस्थित होते.