न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

महाविकास आघाडीसाठी विधानसभा पोषक वातावरण काँग्रेस पक्षाने आपल्याला विधानसभेची उमेदवारी द्यावी – जिल्हाध्यक्ष ॲड धिरज पाटील

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

महाविकास आघाडीसाठी विधानसभा पोषक वातावरण

काँग्रेस पक्षाने आपल्याला विधानसभेची उमेदवारी द्यावी – जिल्हाध्यक्ष ॲड धिरज पाटील

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर शहरातील हॉटेल पाटील वाडा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड धीरज आप्पासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून

उमेदवारीची मागणी केली आहे.या पत्रकार परिषदेसाठी कॉग्रेसचे जनसेवक अमोल कुतवळ, माजी सरपंच संजय कदम यांची उपस्थिती होती.तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे.लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. तुळजापूरच्या विद्यमान आमदारराणा जगजीतसिंह पाटील यांची कारकीर्द निराशा जनक आहे त्यांच्या कार्यकाळात केवळ पोकळ घोषणा आणि विकासाच्या अनुषंगाने संभ्रमावस्था वाढवली आहे प्रश्न सुटले नाहीत. कौडगाव आणि वडगाव येथील औद्योगिक वसाहती ते उभारू शकले नाहीत त्यामुळे तामलवाडी येथे औद्योगिक वसाहत उभारण्याचा त्यांचा दावा फसवा आहे. डॉ. पद्मसिंह पाटील , आमदार पाटील यांनी सूतगिरणी दूध संघ व साखर कारखाना याच्या संदर्भात काय केले हे जिल्ह्याला माहित आहे अशा शब्दात त्यांनी मागील साडेचार वर्षाच्या कारकिर्दीवर टीका केली.श्री तुळजाभवानी मंदिर व तुळजापूर शहर विकासाच्या बाबतीत देखील ते विकासाचा आराखडा निश्चित करू शकले नाहीत हे त्यांचे अपयश आहे. आगामी काळात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर निश्चित अपूर्ण विकासाची कामे पूर्ण केली जातील आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून आपण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी करणार आहोत पक्षाने आपली निष्ठावंत भूमिका लक्षात घेऊन उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.आमदार पाटील उजनीचे पाणी आणणार म्हणून लोकसभेपूर्वी घोषणा करून बसलेले आहेत मात्र पाणी आले नाही या विषयी टीका करताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष धिरज पाटील यांनी उजनीचे पाणी टँकरमध्ये भरून राणा पाटलांच्या दारात आणण्याची उपहसात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. ओमराजे निंबाळकर यांनी जनतेचा आवाज बनून विजय प्राप्त केला आहे हेच वातावरण आगामी विधानसभा निवडणुकीत देखील दिसणार आहे महाविकास आघाडी तुळजापूर विधानसभा मतदारसंघात एकसंघ असून हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे राहावा अशी माझी मागणी आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे