ओबीसी आरक्षण बचाव साठी चालू असलेल्या उपोषणाला धाराशिव ओबीसी समाजाचा पाठिंबा
Post-गणेश खबोले

धाराशिव-प्रतिनिधी
ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती आरक्षण बचाव साठी प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी दी.13 जून पासून वडीगोद्री ता.अंबड जि. जालना येथे अमरण उपोषण चालू केले असून आज दी.17 जून रोजी उपोषणानाचा पाचवा दिवस असून धाराशिव जिल्हा ओबीसी,व्हीजेंएंटी,एसी,एसटी,समाजाच्या वतीने ओबीसी नेते धनंजय (नाना) शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव तेथून जवळपास शेकडो ओबीसी समाज बांधवानी वडीगोद्री येथे उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला यावेळी त्यांच्या सोबत नाभिक समाज जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण माने,ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गोनायजेशन जिल्हा अध्यक्ष इलीयास मुजावर,कामगार नेते सर्फराज पटेल,भावसार अध्यक्ष हिंगुलांबिका सा.सेवा संस्था धाराशिव मिलिंद चांडगे यांच्यासह जिल्ह्यातील जवळपास शेकडो लोक उपस्तीथ होते आज पाचवा दिवस असल्याने राज्यभरातून जवळ पास पंचेवीस ते तीस हजार ओबीसी बांधव आज वडीगोद्री ता.अंबड जि.जालना येथे उपस्तीथ होते.