
लोहारा / प्रतिनिधी
महाशिवरात्री निमित्त लोहारा शहराचे ग्राम दैवत महादेव यांच्या यात्रे निमित्त लोहारा शहरात ४ दिवस भरगच्च सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी दि.१८ रोजी मानाची काटी व पालखीची मिरवणूक काढण्यात आली.मानाच्या काटी व पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर लोहारा चालक मालक संघटनेच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष दगडु तिगाडे,उपाध्यक्ष सुमित झिंगाडे,सचिव देवा महाजन,व्यवस्थापक गणेश तोडकरी,सदस्य सचिन कोळी,मल्लीनाथ बनशेट्टी, लहु रोडगे, रमेश होंडराव, रमेश वागुले, रामकृष्ण कोळी,पिंटु दादा वकील, तुकाराम वाकळे, राहुल माळी, गोकुळ पवार, खंडु सरवदे, अजय रसाळ, आकाश मुळे, विर फावडे, सुमित फावडे,सुशांत रसाळ,चाँद मनियार, किरण सुरवसे, महादेव घाडगे, अशोक लोहार, डिगंबर बर्वे, आनंत रसाळ, नारायण देवकर,शिवराज झिंगाडे, नितीन पवार, सोनु पाटील, विजय होंडराव, विकास थोरात उपस्थित होते.