न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

साठवन तलावासाठी केलेले उपोषण आमदारांच्या आश्वासनानंतर सुटले

Post-गणेश खबोले

 

लोहारा (प्रतिनिधी)

 

शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी शासनाने सन १९९९ साली वडगाव गांजा येथे साठवण तलाव मंजूर केला. त्यासाठी लागणारे शेतजमिनी ही शासनाने संपादित केल्या व त्याचा मावेजा लाभार्थी यांना मिळाला आहे.यातील काही शेतकऱ्यांनी प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्र काढून त्या आधारे मुलांना नोकरी मिळवून दिली आहे. पण यातीलच काही शेतकरी हे काम अडवत आहेत असा आरोप करून वाडी वडगाव गावातील ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिना दिवशी लोहारा येथील तहसील कार्यालया समोर उपोषण चालू केले.
सदर तलावासाठी वाडी वडगाव व वडगाव या दोन्ही गावातील मिळून जवळपास ४८ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले दोन्ही गावांमध्ये प्रत्येक वर्षी जानेवारीपासूनच पिण्याची पाण्याची टंचाई भासत असते.जानेवारीपासून पाऊस पडेपर्यंत टँकर चालू असतात तसेच शेतीच्या पाण्याचाही प्रश्न या ठिकाणी उद्भवतो. पण काही शेतकऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे या ठिकाणी साठवण तलाव कामास मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात काम सुरू झालीच नाही. हे साठवण तलाव झाल्यास दोन्ही गावातील जवळपास ६०० ते ८०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल असे शासनाचे धोरण आहे. शासनाने अनेक प्रयत्न करूनही काही मोजके शेतकऱ्यांमुळे या तलावाचे काम होत नव्हती.
यामुळे वाडी वडगाव गावातील प्रशांत गिराम,निकेश बचाटे,मधुकर गिराम,महादेव बादुले,एकनाथ गिराम,प्रेमनाथ भुजबळ,गोरख भुजबळ,पंडित भुजबळ,अप्पू भुजबळ,काशिनाथ भुजबळ,गहिनीनाथ येलुरे,गोपाळ लकडे,रवी गिराम,संजय बचाटे,दिलीप लकडे,सागर बादुले,अमोल गिराम,बापू गिराम हे नागरिक उपोषणासाठी बसले होते.

यावेळी आ.प्रवीण स्वामी यांनी उपस्थित स्थळी भेट दिली. तहसीलदार,जलसंधारण विभागाचे अधिकारी, भूमी अभिलेख चे अधिकारी यांना बोलावून घेऊन उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या. तसेच दूरध्वनी द्वारे जिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षक यांना बोलून तात्काळ या साठवन तलावाचे काम चालू करण्यासाठी जे सहकार्य लागेल ते करण्याचे सांगितले.आमदार साहेबांनी आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आमदार साहेबांच्या हस्ते पाणी पिऊन हे उपोषण स्थगित केले.

यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य गुंडाप्पा भुजबळ, तहसीलदार रणजीत सिंह कोळेकर ,शिवसेना( उबाठा) तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, जलसंधारण विभागाचे महाजन, नगरसेवक दीपक मुळे, शेतकरी सेना तालुकाप्रमुख शेखर पाटील, शहर प्रमुख सलीम शेख, अंकुश भुजबळ ,संगप्‍पा बादुले आप्पास भुजबळ,महबूब गवंडी,रघुवीर घोडके, दीपक गिराम यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

——————————————————————
1) संगप्पा बादुल

“अनेक वर्षांपूर्वी पासून हे काम काही दिवसात होईल असे मी ऐकत आलो आहे.पण प्रत्यक्षात कामात सुरुवात होतच नाही व काही शेतकरी यास अडथळा निर्माण करत आहेत यामुळे हे काम मार्गी लागत नाही. शासनाने हे काम तात्काळ सुरू करून आम्हास न्याय मिळवून द्यावा”

संगप्पा बादुले

 

साठवण तलाव मंजूर असूनही काही अधिकाऱ्यांच्या टाळाटाळ करण्यामुळे आमच्या गावामध्ये जानेवारीपासूनच पिण्याचे पाणी मिळत नाही तसेच आम्हाला शेती पाण्याअभावी तोट्यात असल्यामुळे आर्थिक संकटांचाही सामना करावा लागतो यामुळे आम्ही उपोषणास बसलो होतो पण आमदार साहेबांनी काम मार्गी लावण्याची आश्वासन देऊन काम सुरू नाही झाल्यास विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करण्याचे अश्वस्थ केल्यामुळे आम्ही हे उपोषण मागे घेतले आहे.

प्रशांत गिराम

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे