उप मुख्यमंत्री “नको तुमची लाडकी बहीण योजना,महिलांना हवी सुरक्षा” ; महाविकास आघाडीचे जोरदार निदर्शने
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

उप मुख्यमंत्री “नको तुमची लाडकी बहीण योजना,महिलांना हवी सुरक्षा” ; महाविकास आघाडीचे जोरदार निदर्शने
गृहमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळा
बदलापूर येथील दोन चिमूरड्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर तुळजापूर येथे महाविकास आघाडी च्या वतीने तहसिल कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी घटनेच्या निषेधार्थ राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी तुळजापूर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपाल यांना निवेदन पाठवून केले आहे दिलेले निवेदनात म्हटले आहे की बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या घटनेच्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ कोळगाव बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर तेथील सफाई कर्मचारी यांनी अनैतिक कृत्य केले आहे त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थी पालक यांच्यामध्ये तीव्र असंतोष असून ही घटना लोकशाही लोकशाहीला घातक आहे हा खटला जलद गती न्यायालयामध्ये चालवून त्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी व सदरील घटनेचा महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत व गृहमंत्री यांनी घटनेची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व तुळजापूर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने झालेल्या घटनेचा निषेधार्थ निषेध करत आहोत यावेळी निवेदनावर
यावेळी ॲड धीरज पाटील , श्याम पवार उत्तम अमृतराव , अनिल शिंदे , अमोल कुतवळ , अनमोल साळुंखे , राहुल खपले , शरद जगदाळे , सुधीर कदम , चंद्रकांत सोनवणे , बाळासाहेब केसरकर , संदीप कदम , तोफिक शेख , मकरंद बामनकर , धनराज शिंदे , नवनाथ जगताप , गोविंद देवकर , संदेश माने आदिंसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत