
लोहारा / प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील मार्डी येथील हजरत खाजा जैनोदीन (जिंदावली) यात्रे निमित्ताने आलेल्या सर्व भाविकाना अलगाजी महेदवीया सोशल ट्रस्ट च्या वतीने थंड पिण्याचे पाणी वाटप करण्यात येत आहे.
अलगाजी महेदवीया सोशल ट्रस्ट च्या वतीने दरवर्षी
हजरत खाजा जैनोदीन (जिंदावली) यात्रेनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत पिण्याचे पाणी वाटप केले जाते.पाणी वाटपाचे यावेळी६ वे वर्ष आहे. आज दि २७ रोजी मोठी यात्रा भरली आहे.सध्या उन्हाचा तडाखा ही वाढला आहे. आशा उन्हाच्या गरमी पासुन थंड पाण्याने येणाऱ्या भाविकांना समाधान लाभत आहे.
यावेळी अलगाजी महेदवीया सोशल ट्रस्टचे युनुस मोमीन, महमद हिप्परगे,सादिक मोमीन, आसिफ जिन्दावली मोमिन,नगरसेवक गौस मोमिन,खुनमिर मोमीन,इस्माईल मोमीन,मुबारक हिप्परगे,सादिक मोमिन,नशिम मोमिन,खुंदमीर मोमिन,हसन मोमिन,हंजिलाल मोमिन,अमजत मोमिन,आसिफ मुस्तफा मोमिन,महबूब मोमिन,अबजुमिया मोमिन,न्यामत हिप्परगे,मोसीन मोमीन, नसीम मोमीन,ताजोदिन मोमिन,आदी उपस्थित होते.